रामचरित मानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक-लोकन यांना युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल
ऑर्गनायझेशन (युनेस्को) ने मान्यता दिली आहे. या साहित्यकृतींचा समावेश ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया- पॅसिफिक रिजनल रजिस्टर’मध्ये करण्यात आला आहे. मेमरी ऑफ द वर्ल्डमध्ये जागतिक महत्त्व आणि सार्वत्रिक मूल्याच्या आधारावर आंतरराष्ट्रीय सल्लागार आणि कार्यकारी मंडळाने शिफारस केलेल्या दस्तऐवजांचा समावेश आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस्कडून या निर्मितीचे प्रादेशिक नोंदणीसाठी नामांकन करण्यात आले होते. युनेस्कोच्या 38 सदस्य आणि 40 निरीक्षक देशांनी या साहित्यनिर्मितीचे जागतिक महत्त्व ओळखले आहे. हे यश हिंदुस्थानी संस्कृतीचा प्रसार आणि संवर्धनासाठी मैलाचा दगड ठरेल, असे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस् कला विभागाचे एचओडी प्राध्यापक रमेश चंद्र गौर म्हणाले. युनेस्कोची मेमरी ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कैज्ञानिक मूल्य असलेल्या दस्ताकेज यांची सुरक्षा करणे आणि लोकांपर्यंत पोहोचणे हे महत्त्वाचे काम करते.
- रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक-लोकन यांसारख्या कार्यांचा हिंदुस्थानी संस्कृती आणि साहित्यावर खोलवर प्रभाव पडला आहे. या साहित्यकृतींनी केवळ हिंदुस्थान नव्हे तर देशाबाहेरील लोकांवरही खोल प्रभाव टाकला आहे.
- या कलाकृतींना युनेस्कोने मान्यता मिळणे ही हिंदुस्थानच्या समृद्ध सांस्कृतिक आणि साहित्यिक वारशासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच या सन्मानामुळे हिंदुस्थानी संस्कृतीच्या जतनाच्या दिशेने नवे पाऊल टाकण्यास मदत होणार आहे.
- रामचरितमानस हा भगवान रामाच्या चरित्रावर आधारित एक धार्मिक ग्रंथ आहे जो गोस्वामी तुलसीदास यांनी अवधी भाषेत लिहिला होता. पंचतंत्र, मूळतः संस्कृत भाषेतील एक रचना ज्यामध्ये दंत आणि लोककथांचा समावेश आहे.