आधी ITR मुदतवाढीचे वृत्त फेटाळले नंतर रात्रीतून दिली एक दिवसाची मुदतवाढ; आयकर विभागाची माहिती

आयकर रिटन्स भरण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर होती. याआधी 31 जुलैची मुदत वाढवून ती 15 सप्टेंबर करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपासून सोशल मिडीयावर ITR भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचे वृत्त फिरत होते. आयकर विभागाने सोमवारी निवदेन जारी करत सोशल मिडीयावरील वृत्त खोटे असून ITR फाईल करण्यासाठ मुदतवाढ देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच करदात्यांनी कोणत्याही एफवांवर विश्वास ठेवू नये आणि मुदत संपण्यापूर्वी आयटीआर फाईल करावा, असे आवाहन केले होते. मात्र, रात्री अचानक आयटीआर फाईल करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देत असल्याचे जाहीर केले. याबाबत विविध तर्क करण्यात येत आहेत.

आयकर विभागाने आयकर रिटर्न (आयटीआर) भरण्याची शेवटची तारीख एका दिवसाने वाढवली आहे. पूर्वी ही अंतिम तारीख 15 सप्टेंबर होती. त्यामुळे आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख आता 16 सप्टेंबर २०२५ झाली आहे. पूर्वी ही तारीख 15 सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. तथापि, आयटीआर दाखल करण्याची सर्वात जुनी अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ होती, ती आधीच वाढवण्यात आली होती. या निर्णयामुळे ई-फायलिंग पोर्टलवर तांत्रिक अडचणींना तोंड देणाऱ्या करदात्यांना दिलासा मिळाला आहे. आता करदात्यांनी वेळेवर आयटीआर भरण्याचे आवाहन केले आहे.

आयकर विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आता एक दिवस वाढवून १६ सप्टेंबर करण्यात आली आहे. आयकर ई-फायलिंग पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे रिटर्न भरण्यात अडचणी येत असलेल्या करदात्यांच्या सोयीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ई-फायलिंग पोर्टलवर आवश्यक अपडेट आणि बदल करण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२:०० ते पहाटे २:३० पर्यंत दुरुस्ती केली जाईल, असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.