
विन्हेरे विभागात शिंदे गटाला जोरदार भगदाड पडले असून कोंडमालुसरे येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेचे उपजिल्हा समन्वयक तथा शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले.
पक्षप्रवेश सोहळ्याला विन्हेरे विभाग संपर्कप्रमुख तुकाराम खेडेकर, विभागप्रमुख महेंद्र जोगळे, उपविभागप्रमुख अरुण आंग्रे, शाखाप्रमुख सुशील सावंत, गणेश आंग्रे, उपशाखाप्रमुख भरत मोरे तसेच अन्य शिवसैनिक उपस्थित होते. या प्रवेशामुळे करंजाडे जिल्हा परिषद गटात शिवसेनेची ताकद अधिकच वाढली आहे. शिवसेनेचा भगवा हाती घेऊन अधिक जोशाने काम करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान, येत्या काळात आणखीन काही कार्यकर्ते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहितीही सोमनाथ ओझर्डे यांनी दिली.
मीरा-भाईंदरच्या काशिमीरा प्रभाग १४ मधील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे शहरप्रमुख प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रामशंकर विश्वकर्मा, दिलेंद्र सिंग, जगदीश गुजर, रोशन चव्हाण यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले.
यावेळी राज्य संघटक उद्धव कदम, प्रदीप उपाध्याय, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हा समन्वय मनोज मयेकर, जिल्हा सचिव श्रेयस हडकर, उपजिल्हाप्रमुख मोजेस चिनाप्पा, किरण मांजरेकर, उपजिल्हा संघटक सुप्रिया घोसाळकर, प्राची पाटील, ग्राहक संरक्षण कक्ष सदस्य सदानंद घोसाळकर, चंद्रपूर संपर्कप्रमुख दिलीप कदम, मनसे शहराध्यक्ष संदीप राणे, दीपेश गावंड, विभागप्रमुख अनिल भोसले, जगदीश जोशी, अरुण मांढरे, कृष्णा पारेकर, दर्पण गावकर, नरेंद्र उपरकर, गौतम म्हसे, प्रथमेश राणे, रोहित सकपाळ, गौरव पगारे आदी उपस्थित होते.



























































