
हिंदुस्थान आणि इंग्लंडदरम्यान 20 जूनपासून सुरू होणाऱया पाच सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी गुरुवारी इंग्लंड संघाची घोषणा झाली. अनुभवी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सकडेच या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने पहिल्या कसोटीसाठी 14 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ही कसोटी 20 ते 24 जूनदरम्यान हेडिंग्ले मैदानावर खेळवली जाणार आहे. या संघात वेगवान गोलंदाज जेमी ओव्हर्टनचे पुनरागमन झाले आहे. गस ऍटकिन्सन याला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
जेमी ओव्हर्टनने शेवटचा कसोटी सामना 2022 साली न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. याचबरोबर फलंदाजीमध्ये इंग्लंडकडून जो रूट, जॅक क्रॉली आणि ओली पॉप यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. शोएब बशीर, जेमी स्मिथ आणि जॅकब बेथेल यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.