IND Vs SL ODI Series 2024 – काळी पट्टी बांधून Team India ची अंशुमन गायकवाड यांना आदरांजली

टी20 मालिकेत श्रीलंकेला चारीमुंड्या चीत केल्यानंतर वन डे मालिकेत सुद्धा श्रीलंकेला धुळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. आज पासून कोलंबोमध्ये वन डे मालिकेला सुरुवात झाली. या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत.

हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्यामध्ये वन डे मालिकेच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रीत केले. मात्र टीम इंडियाचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. त्यामुळे सुरुवातीला चाहत्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला मात्र नंतर बीसीसीआयने ट्वीट करत त्यासंदर्भात माहिती दिली. हिंदुस्थानी संघाचे दिग्गज माजी खेळाडू अंशुमन गायकवाड यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधून अंशुमन गायकवाड यांना आदरांजली वाहिली.

दिग्गज क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे निधन