बांगलादेशात तणाव वाढला! हिंदुस्थानने अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना परत बोलावले

बांगलादेशात कट्टरतावाद्यांकडून हिंदूंना सातत्याने लक्ष्य केले जात असून दिवसेंदिवस तेथील परिस्थिती अधिकच चिघळत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने बांगलादेशला ‘नॉन फॅमिली पोस्टिंग’च्या गटात टाकले असून तेथील हिंदुस्थानी राजनैतिक अधिकाऱयांच्या कुटुंबीयांना तातडीने मायदेशी बोलावले आहे.

बांगलादेशची राजधानी ढाकासह चट्टोग्राम, खुलना, राजशाही आणि सिल्हेट येथे हिंदुस्थानी दूतावासाची कार्यालये आहेत. येथील सर्व अधिकाऱयांच्या नातेवाईकांना परतण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, मात्र बांगलादेशातील सर्व दूतावास पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहेत, असे सूत्रांकडून समजते.

‘जेन झी’ आंदोलनानंतर शेख हसीना सरकार कोसळले. त्यानंतर तेथे मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली काळजीवाहू सरकार आले. तेव्हापासून बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर हल्ले केले जात आहेत.