देशात डेटा सेंटर्सची विजेची मागणी 800 टक्के वाढेल; 2031-32 पर्यंत 13.56 गिगावॉटची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि डिजिटल सेवांच्या वाढत्या वापरामुळे डेटा सेंटर्सची विजेची मागणी वेगाने वाढण्याचा अंदाज आहे. 2031-32 पर्यंत डेटा सेंटर्सकडून विजेची मागणी 13.56 गिगावॉटपर्यंत पोहोचू शकते. सध्या देशात डेटा सेंटरची क्षमता वेगाने वाढत आहे. ही 2020 मध्ये 375 मेगावॉट होती, जी 2025 पर्यंत वाढून सुमारे 1,500 मेगावॉट झाली आहे. पुढील सुमारे 7 वर्षांत विजेची मागणी 800 टक्के वाढण्याचा अंदाज आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले की, देशातील प्रमुख डेटा सेंटर्स मुंबई, नवी मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, नोएडा आणि जामनगर येथे आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, एआय विकासाला चालना देण्यासाठी 14 सेवा प्रदाते आणि डेटा सेंटर्सद्वारे 38,231 जीपीयू उपलब्ध करून देण्यात आले आहेत.