देशाचे परराष्ट्र धोरण पुरते कोलमडले, ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. देशाचे परराष्ट्र धोरण तोंडघशी पडले आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी ट्विट करून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटमधून केंद्र सरकारला तीन सवाल केले आहेत. जेजे स्पष्ट करणार का? हिंदुस्थानला पाकिस्तानसोबत का जोडण्यात आले? पाकिस्तानचा निषेध करण्यात एकाही देशाने हिंदुस्थानला पाठिंबा का दिला नाही? हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्यास ट्रम्प यांना कोणी सांगितले? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले. एकूणच हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण पुरते कोलमडले आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

पहलगामला एक महिना झाला, अजूनही दहशतवादी मोकाट