
हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला कारण होतं आणि हिंदुस्थानला यात मोठं यश मिळालं आहे. तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईची सविस्तर माहिती दिली. या संदर्भात डीजीएमओ राजीव घई म्हणाले की, “9 दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करण्यात आला आणि 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. यामध्ये कंधार अपहरण आणि पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेले युसूफ अझहर, अब्दुल मलिक आणि मुदस्सीर अहमद सारखे दहशतवादी देखील समाविष्ट आहेत.”
राजीव घई म्हणाले की, “सीमेपलीकडून होणाऱ्या पाकिस्तानी गोळीबाराला हिंदुस्थानने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, हिंदुस्थानी सैन्याने नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याचे 30-40 सैनिक आणि अधिकारी ठार केले आहेत. हिंदुस्थानकडून होणाऱ्या प्रत्युत्तर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी पाकिस्तानने नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून केला, परंतु आम्ही कोणत्याही नागरी विमानाला लक्ष्य केले नाही.”