
हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील युद्ध आणि वाढत चाललेल्या तणावाचा फटका अनेक बडय़ा कंपन्यांना बसला असून तब्बल 8 कंपन्यांचे 1.60 लाख कोटी स्वाहा झाल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवडय़ात मुंबई शेअर बाजारातील 30 शेअर्सच्या समभागातील टॉप 10 कंपन्यांना हिंदुस्थान आणि पाकिस्तान युद्धाचा मोफा फटका बसला असून मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांचे जवळपास 60 हजार कोटी रुपये बुडाले.
हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणावाचा पाकिस्तानी शेअर बाजारालाही मोठा फटका बसला. 2021 नंतर सद्याची स्थिती पाकिस्तानी शेअर बाजाराची प्रचंड तणावाची आणि नुकसानाची ठरली. हिंदुस्थानी शेअर बाजारासाठीही गेला आठवडा तापदायक ठरला. अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण दिसली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1.047.52 अंक किंवा 1.30 टक्क्यांच्या घसरण दिसली. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेला सर्वाधिक फटका बसला.
या बडय़ा कंपन्यांनाही फटका
आयटीसी लिमिटेडचे बाजारमूल्य 8,321.89 कोटींनी घसरून 5,29,972.97 कोटी इतके झाले. तर भारती एअरटेलचे बाजारमूल्य 2,138.29 कोटींनी घसरून 10,53,891.62 कोटी रुपये इतके झाले. टाटा समूहाची पंपनी टीसीएसचे भागभांडवल 578.89 कोटी रुपयांनी घसरून 12,45,418.09 कोटी रुपये इतके झाले.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे भागभांडवल घटले
गेल्या आठवडय़ात गुंतवणूकदारांमध्ये देशातील क्रमांक 1 ची श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समाभागात कमालाची घसरण दिसली. त्यामुळे रिलायन्सचे भाग भांडवड घटून 18,64,436.42 कोटी रुपये इतके झाले. त्यामाध्यमातून अंबानींच्या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना 59,799.34 कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर आयसीआयसीआय बँकेचे भागभांडवल 30,185.36 कोटी रुपयांनी घटून 9,90,015.33 कोटी रुपये इतके झाले.
बँकांसाठी गेला आठवडा ठरला नुकसानीचा
बँकांसाठी गेला आठवडा अत्यंत खराब ठरला. एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्य 27,062.52 कोटींनी घसरून ते 14,46,294.43 कोटी रुपये इतके झाले. तर देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयचे बाजारमूल्य 18,429.34 कोटी रुपयांनी घसरून 6,95,584.89 कोटी रुपये इतके झाले. तर फायनान्स कंपनी बजाज फायनान्सचे
बाजार मूल्य 13,798.85 कोटी रुपयांनी घसरून 5,36,927.95 कोटी इतके झाले.