हिंदुस्थानची श्रीलंकेला आणखी 50 टनांची मदत

पूर आणि भूस्खलनामुळे मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या श्रीलंकेला हिंदुस्थानने आणखी 50 टन रेशनची मदत पाठवली आहे. ‘ऑपरेशन सागर बंधू’ अंतर्गत आतापर्यंत श्रीलंकेला एकूण 1134 टन हून अधिक आवश्यक वस्तूंची मदत पाठवली आहे. यामध्ये खाण्यापिण्याचे रेशन, तंबूसाठी लागणारे साहित्य, स्वच्छता कीट, कपडे आणि 14.5 टन औषधे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. आतापर्यंत सात हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.