
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानच्या ऊर्जा धोरणाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, हिंदुस्थान आता इराणऐवजी व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाची खरेदी करेल. या निर्णयावरून आता देशांतर्गत राजकारण तापले असून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे हिंदुस्थानला आता तिथून तेल आयात करणे कठीण होईल. त्याऐवजी व्हेनेझुएला हा हिंदुस्थानसाठी तेलाचा नवा स्रोत असेल. अमेरिकेच्या या दबावामुळे हिंदुस्थानला आपल्या पारंपरिक तेल पुरवठादार देशांमध्ये बदल करावा लागत असल्याचे चित्र दिसत असल्यासचे बोलले जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान इराणऐवजी व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करेल या विधानावर रविवारी काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली. काँग्रेसने म्हटले आहे की, अमेरिकन नेते सतत आपल्या सरकारने काय केले आहे किंवा काय करण्याची योजना आखत आहे याची माहिती देत असतात.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्रम्प यांच्या विधानाचा ऑडिओ X वर शेअर केला आहे. ते म्हणाले की, “ट्रम्प यांनी आम्हाला कळवलं होतं की ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आलं आहे. त्यांनी आम्हाला सांगितले की, हिंदुस्थानने रशियन तेल खरेदी करणं थांबवलं आहे. आता ते ही नवीन माहिती शेअर करत आहेत.” ते म्हणाले की, “आपल्या सरकारने काय केले आहे किंवा काय करणार आहे, याबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आपल्याला माहिती देतात.”
He told us Op Sindoor had been halted. He told us India had stopped buying Russian oil. And now this.
President Trump continues to give us information on what our own Govt has done or will be doing.
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) February 1, 2026























































