
हिंदुस्थान आणि बांग्लादेश संघात चेन्नईमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने खणखणीत शतक ठोकले आहे. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या रस्ते अपघातानंतर तब्बल 633 दिवसानंतर पंतने कसोटी संघात कमबॅक केले आणि वेगवान शतक झळकावले. पंतने 124 चेंडूंचा सामना करत सहाव्या कसोटी शतकाला गवसणी घातली. 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने त्याने ही खेळी सजवली. यासह त्याने माजी कर्णधार एम.एस. धोनीच्या शतकांचीही बरोबरी केली.
हिंदुस्थानचा दुसरा डाव 3 बाद 67 असा संकटात असताना ऋषभ पंत मैदानात उतरला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पंतने सलामीवीर शुभमन गिलसोबत मैदानावर शड्डू ठोकला. दोघांनीही बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत धावफलक हलता ठेवला. संधी मिळताच चौकार-षटकारांचीही आतिषबाजी सुरू होती. यादरम्यान पंतने शतक झळकावले. त्यानंतर तो बाद झाला.
A CENTURY on his return to Test cricket.
What a knock this by @RishabhPant17 👏👏
Brings up his 6th Test ton!
Live – https://t.co/jV4wK7BgV2…… #INDvBAN@IDFCFIRSTBank pic.twitter.com/A7NhWAjY3Z
— BCCI (@BCCI) September 21, 2024
धोनीशी बरोबरी
दरम्यान, हिंदुस्थानकडून सर्वाधिक कसोटी शतक ठोकणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत पंतने धोनीशी बरोबरी साधली. पंतने 58 डावात 6 शतक, धोनीने एवढेच शतक ठोकण्यासाठी 144 डाव घेतले. तिसऱ्या स्थानावर ऋद्धिमान सहा असून त्याने 54 डावात 3 शतक ठोकले आहेत.
बांगलादेशपुढे 515 धावांचे आव्हान
पंत बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि केएल राहुल यांच्यात अर्धशतकीय भागिदारी झाली. गिलनेही शतक साकारत हिंदुस्थानची आघाडी 500 पार पोहोचवली. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने हिंदुस्थानचा डाव 287 धावांनी घोषित करत बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे आव्हान दिले.