हिंदुस्थानने मोहाली जिंकले ,दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून धुव्वा

646

विराट कोहलीच्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाने बुधवारी येथे झालेल्या दुसऱ्या ट्वेण्टी-20 लढतीत पाहुण्या दक्षिण आफ्रिकन संघाचा सात गडी व सहा चेंडू राखून धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेल्या 150 धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाने तीन गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. शिखर धवनने 40 धावांची, कर्णधार विराट कोहलीने नाबाद 72 धावांची आणि श्रेयस अय्यरने नाबाद 16 धावांची खेळी साकारत विजयावर शिक्कामोर्तब केले.   त्याआधी हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. कर्णधार क्विण्टॉन डी कॉकने 52 धावांची आणि तेम्बा बवुमाने 49 धावांची खेळी केली. दीपक चहरने दोन आणि नवदीप सैनी, रवींद्र जाडेजा व हार्दिक पांडया यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

आपली प्रतिक्रिया द्या