
आयसीसी टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी आमचा प्रवास निश्चित असून तिकिटेही बुक झाली आहेत आणि संघ कोलंबोला जाणारच. पाकिस्तानने बहिष्काराची भूमिका घेतली असली तरी हिंदुस्थान मागे हटणार नाही, असा पवित्रा हिंदुस्थानी कर्णधार सूर्यकुमार यादवने घेतला आहे.
15 फेब्रुवारीला पारंपरिक प्रतिस्पर्ध्याशी सामना नियोजित आहे. मात्र सुरक्षा कारणांचा हवाला देत पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला सामन्यात न खेळण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे हा सामना कोलंबोत म्हणजेच तटस्थ ठिकाणी होते आहे. बांगलादेशने हिंदुस्थानमध्ये खेळण्यास नकार दिल्यानंतर स्पर्धेत त्यांच्या जागी स्कॉटलंडला सहभागी करून घेण्यात आले आहे. हेच प्रकरण टी-20 वर्ल्ड कपसाठी डोकेदुखी ठरतेय.
मुंबई येथे झालेल्या स्पर्धापूर्व कर्णधारांच्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने आपली परखड भूमिका मांडली. पाकिस्तानचा न खेळण्याचा निर्णय आमच्या नियंत्रणात नाही. हिंदुस्थानने कधीही सामना खेळण्यास नकार दिलेला नाही. आयसीसीने स्पर्धेचे वेळापत्रक ठरवले असून हिंदुस्थानी संघाची तयारी पूर्ण आहे. 7 फेब्रुवारीला सामना खेळल्यानंतर संघ कोलंबोला रवाना होणार, असे सूर्यकुमार म्हणाला. तो पुढे म्हणाला, हिंदुस्थानने याआधी पाकिस्तानविरुद्ध चांगले क्रिकेट खेळले आहे.
सामना 15 तारखेला तटस्थ स्थळी आहे आणि संधी मिळाल्यास हिंदुस्थान निश्चितपणे खेळेल. हा निर्णय पाकिस्तानी खेळाडूंनाही कठीण असू शकतो, मात्र हिंदुस्थानची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे.
India will not back down: suryakumar yadav’s bold stand on t20 world cup clash with Pakistan
Indian captain suryakumar yadav confirms team India will travel to Colombo for the 15th february match against Pakistan. “we have never refused to play,” says sky.





























































