44 धावांत बांग्लादेशने गमावले 4 गडी,दुसऱ्या डावातही बांग्लादेशची घसरगुंडी

720

बांग्लादेशविरूद्धच्या कसोटी सामन्यात हिंदुस्थानी संघाने 493 धावांवर डाव घोषित केला आहे. हिंदुस्थानी संघाकडे आता 343 धावांची आघाडी असून दुसऱ्या डावातही बांग्लादेशची घसरगुंडी सुरूच आहे. हिंदुस्थानी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे पाहुण्यांची सकाळी 11 वाजेच्या सुमारास 4 बाद 44 अशी अवस्था झाली होती. मोहम्मद शमीने 2 तर इशांत शर्मा आणि उमेश यादव या दोघांनी प्रत्येकी एक बळी टीपले.

इंदूरच्या होळकर मैदानावर शुक्रवारचा खेळ सुरू झाल्यावर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली, पण त्यानंतर पुजारा 54 धावांवर बाद झाला. पाठोपाठ विराटही शून्यावर माघारी परतला. पण रहाणेच्या साथीने अगरवालने डाव सावरला. रहाणे 86 धावांवर बाद झाला, अग्रवालने मात्र दमदार द्विशतक ठोकले. मात्र द्विशतकानंतर तुफान फटकेबाजीच्या प्रयत्नात तो 243 धावांवर बाद झाला. त्याने 330 चेंडूंत विक्रमी 243 धावांची द्विशतकी खेळी साकारली. त्यात 28 चौकार आणि 8 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. अगरवाल-रहाणे जोडीने चौथ्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी साकारताना बांगलादेशी गोलंदाजीची अक्षरशः कत्तलच केली.

जाडेजाचीही तुफान फटकेबाजी

मयांक बाद झाल्यावर जाडेजाने तुफान फटकेबाजी केली. सध्या जाडेजा 60 तर उमेश यादव 25 धावांवर खेळत आहे. अष्टपैलू जाडेजाने 76 चेंडूंत नाबाद 60 धावांची खेळी केली आहे. त्याने 6 चौकार आणि 2 षटकारांची नोंद केली आहे. बांगलादेशकडून अबू जायेदने 4 तर मेहिदी हसन मिराज आणि एबादत यांनी 1-1 गडी बाद केला

आपली प्रतिक्रिया द्या