
पहलगाम हल्ल्याचा बदला घेत हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधील 9 दहशतवाद्यांच्या ठिकाणावर हल्ले केले आहेत. यात जैश ए मोहम्मदच्या बहावलपूरचाही समावेश आहे. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रात्री 1.44 वाजता हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांवर हल्ला केला आहे. तसेच हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरच्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले करून ऑपरेशन सिंदूर राबवले आहे. ज्या जागेतून दहशतवादी हल्ल्याचे कट रचले जात होते तिथे हे हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात जैश ए मोहम्मद आणि लश्कर ए तोयबाची ठिकाणं उद्ध्वस्त झाली आहे.
या हल्ल्यात पाकिस्तानी सैनाच्या कुठल्याही ठिकाणांवर हल्ला केला गेला नाही. या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानी सैन्यानेही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानच्या 6 ठिकाणी 24 हल्ले झाल्याची कबुली पाकिस्तानी सैन्याने दिली आहे. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू 33 जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ही कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे.
हिंदुस्थानी सैन्याने जरी पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये हे हल्ले केले असले तरी हे हल्ले हिंदुस्थानातूनच केले आहेत. या हल्ल्या हिंदुस्थानी सैन्य, नौदल आणि वायुसेनेच्या आधुनिक हत्यारांचा वापर करण्यात आला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये दहशतवाद्यांची ठिकाणं कुठे आहेत याची माहिती देशाच्या गुप्तचर संस्थांनी दिली होती.