मोदी है तो मुमकीन है! हिंदुस्थानी रुपया बांगलादेशच्या ‘टाका’बरोबरीने घसरतोय

डॉलरच्या तुलनेत खराब कामगिरी करणाऱया आशियाई चलनांमध्ये रुपयाचा नंबर दुसरा आहे. ऑगस्ट महिन्यात रुपयाच्या मूल्यात 0.2 टक्क्याची घसरण झाली, तर बांगलादेशच्या चलनाची म्हणजेच ‘टाका’ची कामगिरी सगळ्यात वाईट होती. चालू आर्थिक वर्षात ‘टाका’चे मूल्य डॉलरच्या तुलनेत 0.6 टक्क्याने घसरले.

आशियाई देशांच्या चलनांचा विचार केला तर फक्त हिंदुस्थान आणि बांगलादेशच्या चलनांचे मूल्य घसरल्याचे दिसून येतेय. ऑगस्टमध्ये रुपया 0.2 टक्के घसरला. शुक्रवारी रुपया 83.89 प्रतिडॉलरवर बंद झाला. अमेरिकन डॉलर कमपुवत असतानाही रुपयाची कामगिरी घसरली. इक्विटी सेगमेंटमध्ये विदेशी गुंतवणूक कमी होणे आणि डॉलरची मागणी वाढणे आदी कारणांचा परिणाम रुपयावर दिसून येतोय. ऑगस्ट महिन्यात विदेशी चलनांनी डॉलरच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. 2023मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाने कमी अस्थिरता दर्शवली. ही तीन दशकांतील सगळ्यात चांगली कामगिरी होती.

– चालू आर्थिक वर्षात रुपयामध्ये 0.6 टक्के घसरण झाली. आर्थिक वर्ष 2023-24मध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत हाँगकाँग डॉलर आणि सिंगापूर डॉलरनंतर रुपया तिसऱया क्रमांकाचे स्थिर आशियाई चलन होते. त्यामध्ये 1.5 टक्के घसरण झाली.