‘इंडियन आयडॉल 3’ चा विजेता प्रशांत तमांग याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

संगीत क्षेत्रातून एक वाईट बातमी समोर येत आहे. ‘इंडियन आयडॉल 3’ चा विजेता प्रशांत तमांग याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो 43 वर्षांचा होता. प्रशांत तमांग याचे दिल्लीत जनकपुरी येथील घरी निधन झाले.

वृत्तानुसार, हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्याला तेथील द्वारका रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. अरुणाचल प्रदेशात एक शो केल्यानंतर तो घरी परतला होता आणि काही वेळाने त्याला अटॅक आला. मात्र त्याला आरोग्याबाबत कोणत्याही समस्या नव्हत्या.

प्रशांत याचा जन्म 4 जानेवारी 1983 मध्ये झाला होता. लहान असतानाच त्याच्यावरील वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने कोलकाता पोलीसमध्ये कॉन्स्टेबलची नोकरी केली. तिथे त्याने पोलीस ऑर्केस्ट्रासोबत गाणे गायले. 2007 मध्ये त्याने ‘इंडियन आयडॉल 3’ साठी ऑडिशन दिले आणि तिथून त्याचे नशीब पालटले. तो त्या शोचा विजेता झाला. त्यानंतर त्याने अनेक शो केले, त्याने अभिनयातही आपले नशीब आजमावले. त्याने मागे वळून पाहीले नाही. विशेष म्हणजे तो सलमान खानचा आगानी सिनेमा ‘बॅटल ऑफ गलवान’मध्येही दिसेल.