हिंदुस्थानातील लोक इतर देशांच्या तुलनेत अधिक रोमॅण्टिक असल्याचे बोलले जाते. आता हिंदुस्थानी पुरुषांच्या डेटिंग स्टाईलचे कौतुक करणारा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ब्री स्टील नावाची ऑस्ट्रेलियन ट्रव्हलर गेल्या एक वर्षापासून हिंदुस्थानातील विविध शहरांना भेट देतेय. इन्स्टाग्रामवरील व्हिडीओत तिने हिंदुस्थानातील डेटिंग संस्कृती आणि ऑस्ट्रेलियाच्या डेटिंग संस्कृतीची तुलना केली.
ब्री स्टील म्हणते, ऑस्ट्रेलियातील तरुण विनोदी शैलीत फ्लर्ट करतात. खरे तर ते चुकीचे आहे. मात्र हिंदुस्थानात प्रत्येक जण एकमेकांशी चांगला व्यवहार करतो असा माझा अनुभव आहे. मी एका पार्टीत गेली असता फ्लर्ट करताना एका मुलाने अचानक माझा हात धरला, पण ऑस्ट्रेलियात असे कधीच होणार नाही. ब्री स्टील पुढे म्हणाली, काही दिवसांपूर्वी हिंदुस्थान दौऱ्यावर असताना मी डेटिंग इव्हेंटला गेली होती. हा प्रसंग मला शाळेतील एखाद्या कार्यक्रमासारखा वाटला.
View this post on Instagram
अखेरपर्यंत महिला फक्त इतर महिलांशीच बोलत राहिल्या आणि पुरुषही तेच करत राहिले. डेटिंग ही संकल्पना हिंदुस्थानात अजून नवीन आहे. तिथल्या डेटिंग संकल्पनेवर बॉलीवूडचा खूप प्रभाव आहे. अनेक जण डेटिंगच्या वेळी सिनेमातील एखाद्या रोमॅण्टिक सीनसारखे वागतात. जणू काही त्यांना कुणी क्रीप्ट लिहून दिली आहे. मला वाटते की, इतर देशांच्या तुलनेत हिंदुस्थानातील र्ंडेटिंग संस्कृती फार वेगळी आहे. इथे बहुतांश ठिकाणी अरेंज मॅरेज होत असावेत असे दिसते.