निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम

येमेन जेलमध्ये बंद असलेली हिंदुस्थानी नर्स निमिषा प्रिया हिच्यावर फाशीच्या शिक्षेची टांगती तलवार कायम आहे. मंगळवारी तिला तूर्त दिलासा मिळाला होता, परंतु मृत तलाल आबादो मेहदी याच्या कुटुंबाने स्पष्ट केले आहे की, त्यांना ब्लड मनी नकोय. तलालचा भाऊ अब्देलफतेह मेहदीने म्हटले आहे की, आम्ही  सर्व ऑफर फेटाळल्या आहेत.