
रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सीटवर एक स्वच्छ चादर आणि उशी दिली जाते. त्यामुळे प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास सुखाचा होतो. प्रवाशांचा थंडीपासून बचाव होतो, परंतु आता यासारखी सुविधा रेल्वेने स्लीपर कोचमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. साध्या स्लीपर कोचमध्ये चादर आणि उशी दिली जाणार आहे, परंतु यासाठी प्रवाशांना तिकिटाव्यतिरिक्त अतिरिक्त 50 रुपये मोजावे लागणार आहेत. ही सुविधा 1 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून सुरुवातीला पायलट प्रोजेक्टअंतर्गत केवळ 10 ट्रेनमध्ये ही सुविधा सुरू केली जाणार आहे.
चेन्नई-मंगळुरू सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि चेन्नई एग्मोर-मंगळुरू एक्स्प्रेससह एकूण 10 ट्रेनमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. या ठिकाणी ही योजना यशस्वी झाल्यास बाकीच्या ट्रेनमध्ये ही सुविधा सुरू केली जाण्याची योजना आहे. दक्षिण रेल्वेच्या या निर्णयामुळे नॉन एसी स्लीपर कोचने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. एसी स्लीपर कोचने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही सुविधा फ्री मिळते. यासाठी कोणतेही अतिरिक्त पैसे घेतले जात नाहीत, परंतु एसी तिकीट आणि नॉन एसी तिकिटामध्ये फरक आहे. नॉन एसीचे तिकीट 200 रुपये असेल तर एसी कोचचे तिकीट किमान 600 रुपये असते. कव्हर असणाऱया उशीसाठी आणि बेडशीटसाठी 50 रुपये द्यावे लागतील. केवळ बेडशीट हवे असेल तर 20 रुपये आणि कव्हरची उशी हवी असेल तर 30 रुपये प्रवाशांना द्यावे लागतील.
कोणकोणत्या ट्रेनमध्ये मिळणार सुविधा
- 12671/12672 नीलगिरी सुपरफास्ट एक्स्प्रेस
- 12685/12686 मंगळुरू सुपरफास्ट एक्स्प्रेस
- 16179/16180 मनारगुड़ी एक्स्प्रेस
- 20605/20606 तिरुचेंदूर सुपरफास्ट एक्स्प्रेस
- 22651/22652 पालघाट एक्स्प्रेस
- 20681/20682 सिलंबु सुपरफास्ट एक्स्प्रेस
- 22657/22658 तांबरम-नागरकोइल सुपरफास्ट
- 12695/12696 तिरुवनंतपुरम सुपरफास्ट एक्स्प्रेस
- 22639/22640 अलेप्पी सुपरफास्ट एक्स्प्रेस
- 16159/16160 मंगळुरू एक्स्प्रेस
10 ट्रेनमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. या ठिकाणी ही योजना यशस्वी झाल्यास बाकीच्या ट्रेनमध्ये ही सुविधा सुरू केली जाण्याची योजना आहे.































































