ब्रिटनमध्ये हिंदुस्थानी विद्यार्थ्याची हत्या

ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या एका 30 वर्षीय हिंदुस्थानी विद्यार्थ्याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. विजय कुमार श्योराण असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा हरयाणाचा आहे. वॉर्सेस्टरच्या बारबॉर्न रोडवर विजय गंभीर अवस्थेत आढळून आला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या हत्येप्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे.