हिंदुस्थानच्या विजयाची पाटी कोरी! गट फेरीतील अखेरच्या सामन्यात तैपेईकडून पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी संघाची एएफसी महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत विजयाची पाटी अखेर कोरीच राहिली. ‘क’ गटामधील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात हिंदुस्थानला चायनीज तैपेईकडून 3-1 असा पराभव स्वीकारावा लागला.

हिंदुस्थानकडून मनीषा कल्याण हिने 39व्या मिनिटाला एकमेव गोल केला. चायनीज तैपेईकडून सु यू-हसुआन (12 वे मिनिट) आणि चेन यू-चिन (77 वे मिनिट) यांनी गोल नोंदवले. त्यात हिंदुस्थानी गोलरक्षक पंथोई चानू हिच्याकडून भरपाई वेळेत झालेल्या दुर्दैवी आत्मघातकी गोलमुळे तैपेईचा आघाडीचा फरक वाढला. या निकालामुळे हिंदुस्थानी संघ गटात तळाशी राहिला, तर जपानने अव्वल स्थान संपादले. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात हिंदुस्थानला व्हिएतनामविरुद्ध 2-1 तर जपानकडून 11-0 अशी हार सहन करावी लागली होती.