
ताज हॉटेलची गणना भारतातील नामांकित हॉटेल्समध्ये केली जाते. पण सध्या या हॉटेलमध्ये एका तरुणीसोबत घडलेल्या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. प्रत्यक्षात, ताज हॉटेलमध्ये एक तरुणी डिनरसाठी गेली होती. ती ताज हॉटेलच्या टेबलवर जेवताना मांडी घालून बसली होती. त्यानंतर हॉटेलच्या मॅनेजरने तिला बसण्याची योग्य पद्धत शिकवू लागले. महिलेनं हा संपूर्ण प्रसंग व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला.
‘यूअरस्टोरी’च्या संस्थापक आणि CEO श्रद्धा शर्मा यांनी ताज हॉटेलच्या अधिकाऱ्यांवर त्यांना त्यांच्या फाईन डाइनिंग रेस्टॉरंट ‘हाऊस ऑफ मिंग’ मध्ये मांडी घालून बसल्यामुळे अपमानित केल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओसोबत त्यांनी सांगितले की, दिवाळीच्या काळात त्या आपल्या बहिणीसोबत ‘हाऊस ऑफ मिंग’ मध्ये डिनरसाठी गेल्या होत्या, तेव्हा ही घटना घडली.
त्यांनी सांगितले की त्या मांडी घालून बसल्या होत्या आणि अचानक मॅनेजरने त्यांच्या बसण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. मॅनेजरने त्यांना “योग्य रीतीने बसा” असे सांगितले कारण इतर पाहुण्यांना त्यांच्या या बसण्याच्या पद्धतीमुळे अवघडल्या सारखे होत असल्याचे सांगितले गेले.
श्रद्धा शर्मा यांनी एक्सवर लिहिले, की एक सामान्य व्यक्ती, जी कष्ट करून आपले पैसे कमावते आणि आपल्या सन्मानाने ताज हॉटेलमध्ये येते, तिलाही या देशात अपमान सहन करावा लागतो. माझी चूक काय होती? फक्त इतकीच की मी नेहमीप्रमाणे पद्मासनात बसले? ही माझी चूक आहे का की ताज मला शिकवतोय की कसे बसायचे आणि काय करायचे?
इतकंच नव्हे, तर मॅनेजरने त्यांच्या पारंपरिक सलवार-कमीज आणि कोल्हापुरी चप्पल यावरूनही त्यांचा अपमान केला. श्रद्धा शर्मा यांनी सांगितले की त्यांनी मेहनतीने पैसे कमावले आणि फाईन डाइनिंग रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी आल्या, पण हॉटेल समृद्धी, संस्कृती आणि वर्गभावनेने भरलेले वाटले.मॅनेजरने त्यांना सांगितले की, “हे फाईन डाइनिंग रेस्टॉरंट आहे आणि येथे बरेच श्रीमंत लोक येतात, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बसले पाहिजे.” एवढंच नव्हे तर मॅनेजरने त्यांना “क्लोज्ड शू” घालण्याचाही सल्ला दिला.
यावर नाराज झालेल्या शर्मा म्हणाल्या, “मी कोल्हापुरी चप्पल घालते, त्या मी माझ्या कष्टाच्या पैशांनी घेतल्या आहेत आणि येथे आले आहे. पण येथे स्टाफने मला ‘पाय खाली ठेवून बसा’ असं सांगणं पूर्णपणे चुकीचं आहे.” त्यांनी पुढे सांगितले की त्या उद्योगपती रतन टाटा यांचा खूप आदर करतात, पण या घटनेने त्यांना ताज हॉटेलकडून मोठी निराशा झाली आहे.
एक आम इंसान, जो मेहनत करके, अपना पैसा कमा कर, अपनी इज़्ज़त के साथ ताज होटल में आता है — उसे आज भी इस देश में ज़लील और अपमानित होना पड़ता है।
और मेरी गलती क्या है? सिर्फ़ ये कि मैं बैठ गई एक “regular padmasana style” में?
क्या ये मेरी गलती है कि ताज मुझे सिखा रहा है कि कैसे बैठना… pic.twitter.com/vKBYjg8ltb— Shradha Sharma (@SharmaShradha) October 21, 2025