
परदेशात शिक्षण घेण्यासाठी हिंदुस्थानींनी गेल्या 10 वर्षात तब्बल 1.76 लाख कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आरटीआयअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. या प्रचंड रकमेचा वापर देशात तब्बल 62 आयआयटी किंवा नवीन शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी केला जाऊ शकला असता. त्यामुळे देशातील शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एक इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी उभारण्यासाठी 2025 मध्ये सुमारे 2,823 कोटी रुपये खर्च येतो. म्हणजेच गेल्या दहा वर्षांत परदेशी शिक्षणावर झालेल्या 1.76 लाख कोटी रुपयांमध्ये हिंदुस्थानात दोन आयआयटी उभ्या राहू शकल्या असत्या.
2023-24 या वर्षात ह्दुंस्थानींनी परदेशातील शिक्षणासाठी 29,000 कोटी रुपये पाठवले. यातून 10 हून अधिक आयआयटी उभारता आल्या असत्या.
गेल्या दहा वर्षांत परदेशी शिक्षणावर होणारा खर्च 1,200 टक्क्यांनी वाढला आहे. 2014 मध्ये हा आकडा 2,429 कोटी रुपये होता. तोच खर्च 2022-23 मध्ये 29,171 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.
2025-26 या वर्षासाठीचे परदेशातील उच्च शिक्षणाचे बजेट 50,077.95 कोटी रुपये आहे, परंतु हिंदुस्थानींनी गेल्या दहा वर्षांत परदेशी शिक्षणावर केलेला खर्च हा बजेटच्या तिप्पट असल्याचे समोर आले आहे.