
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हिंदुस्थान आणि नामिबिया यांच्यात झालेल्या विश्वचषक सामन्यात, हिंदुस्थानी संघाने नामिबियाला पराभूत केले आहे. नामिबियाचा 93 धावांनी पराभव करत सुपर 8 साठी आपले स्थान मजबूत केले आहे. या सामन्यात, नामिबियाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
2026 च्या टी-20 विश्वचषकातील 18 व्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा नामिबियाशी सामना झाला. नामिबियाने नाणेफेक जिंकून हिंदुस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रत्युत्तरादाखल हिंदुस्थानने 9 विकेट गमावून 209 धावा केल्या. नामिबियासमोर विजयासाठी 210 धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांचा संघ फक्त 116 धावांवरच आटोपला.
नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांचा निर्णय अपयशी ठरला. प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानची सुरुवात चांगली झाली. संजू सॅमसनने मैदानात येताच तीन उत्तुंग षटकार मारले. तो फक्त 8 चेंडूत 22 धावा काढून बाद झाला. त्यानंतर इशान किशनने 20 चेंडूत जलद अर्धशतक झळकावले. तो 61 धावा काढून बाद झाला. हार्दिक पंड्याने 28 चेंडूत 52 धावा करत हिंदुस्थानच्या डावाचे नेतृत्व केले. तिलक वर्माने 25 , तर सूर्यकुमार यादव 12 धावा काढून बाद झाला. हिंदुस्थानने 20 षटकांत 9 गडी गमावून 209 धावा केल्या. नामिबियाने शेवटच्या दोन षटकांत शानदार गोलंदाजी केली, एकामागून एक विकेट घेतल्या आणि हिंदुस्थानला 209 धावांवर रोखले.
210 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाचा संघ 18.2 षटकांत 116 धावांवर सर्वबाद झाला. नामिबियाकडून लॉरेनने 29 धावा केल्या, तर जान फहलिंकने 22 धावा केल्या. इतर दोन फलंदाजांनी दुहेरी आकडा ओलांडला. परंतु त्यानंतर उर्वरित 7 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत आणि पराभव झाला.
हार्दिक पंड्याने 2, वरुण चक्रवर्तीने 3, अक्षर पटेलने 2, शिवम दुबे, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

























































