माऊंटेड गनची चाचणी!

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) देशातील पहिली माऊंटेड गन सिस्टम बनवली आहे. या गनला डीआरडीओच्या व्हीकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने (व्हीआरडीई) विकसित केली आहे. या गनची आज चाचणी घेण्यात आली. फिल्ड ट्रायलनंतर ही गन सिस्टम लवकरच हिंदुस्थानी लष्करात दाखल केली जाईल. या गनने सीमारेषेवर देखरेख केली जाणार आहे. या गनचे खास वैशिष्टय़ म्हणजे या गनमधून अवघ्या काही सेकंदांत फायरिंग केले जाते. त्यामुळे शत्रूंची आता खैर नाही.