
हिंदुस्थानची मराठमोळी टेनिसपटू ऋतुजा भोसले हिने ब्रिटनच्या नायक्ता बेन्स हिच्या साथीत खेळताना आयटीएफ डब्ल्यू 75 स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात त्यांनी पोलिना याट्सेन्को व सोफ्या लॅन्सरे या रशियन जोडीचा 6-2, 1-6, 10-6 अशा फरकाने पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. पुण्याच्या ऋतुजाचे हे हंगामातील तिसरे दुहेरीचे विजेतेपद ठरले, हे विशेष. या विजयामुळे तिने सातत्यपूर्ण कामगिरीला आणखी अधोरेखित करणारा मानाचा टप्पा गाठला आहे.