श्रीनगरमध्ये फुलांचा सुगंध दरवळणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीनगरमधील आशियातील सर्वात मोठे इंदिरा गांधी मेमोरियल तुलीप गार्डन येत्या 16 मार्चपासून पर्यटकांसाठी खुले केले जाणार आहे. यंदा या गार्डनमध्ये 70 ते 75 विविध जातींचे 1.8 मिलियन तुलीप असणार आहेत. पर्यटकांसाठी 18 लाख तुलीप बल्ब आणि एक लाख अन्य फुले लावली आहेत. गेल्या वर्षी 8.5 लाख पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली होती. पर्यटकांसाठी गार्डन खुले करण्याआधी फुलांची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे.