
सामना प्रतिनिधी । मुंबई
वाढती वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणकडून ‘वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा’ ही योजना राबवली जात आहे. त्यानुसार गेल्या तीन वर्षांत वीजचोरीची माहिती दिलेल्या 36 लोकांना महावितरणने तब्बल 40 लाख रुपयांची रक्कम बक्षीस रूपाने दिली आहे. तर वीजचोरीची माहिती मिळताच केलेल्या कारवाईमुळे महावितरण सुमारे 40 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वसूल करू शकले आहे.
दरम्यान, वीजचोरीची माहिती देणाऱ्याचे नाव महावितरणकडून गुप्त ठेवले जाते.



























































