
जगभरातील प्रसिद्ध कंपन्या कर्मचारी कपात करत असताना इन्फोसिस कंपनी तब्बल 20 हजार फ्रेशर्संना नोकरी देणार आहे. इन्फोसिसचे सीईओ सलिल पारेख यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली. कंपनीने याआधी पहिल्या तिमाहीत 17 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत 20 हजार पदवीधारकांना नोकरीची संधी दिली जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) आणि रीस्किलिंगमध्ये करण्यात आलेल्या कंपनीला फायदा होईल, असे ते म्हणाले. इन्फोसिसने आतापर्यंत विविध स्तरांवर 2.75 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना एआयचे प्रशिक्षण दिले आहे. कोडिंगसारख्या क्षेत्रात एआयमुळे 5 ते 15 टक्क्यांपर्यंत उत्पादकता वाढली आहे.
टीसीएसमध्ये कर्मचारी कपात
एकीकडे इन्फोसिसमध्ये कर्मचारी भरती केली जात असताना दुसरीकडे टीसीएसमध्ये 2 टक्के म्हणजेच जवळपास 12 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ही कर्मचारी कपात जुलै ते सप्टेंबर या महिन्यात केली जाणार आहे. या कर्मचारी कपातीचा सर्वात जास्त फटका मध्यम ते वरिष्ठ लेवलच्या कर्मचाऱ्यांवर पडणार आहे. यामध्ये ज्यांचा अनुभव 15 ते 20 वर्षांपर्यंतचा आहे त्या कर्मचाऱ्यांना वार्षिक पगार 35 लाख ते 80 लाखांपर्यंत आहे. नोकरीवरून काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी तीन ते पाच महिन्यांचा अतिरिक्त पगार देणार आहे.