इन्स्टाग्रामवर एका पोस्टने सेलिब्रेटी मालामाल, हॉलीवूड अभिनेता ड्वेन जॉन्सन कमावतो सात कोटी

ड्वेन जॉन्सन (द रॉक)

इन्स्टाग्राम  हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. पण अनेकांसाठी ते कमाईचे मोठं साधन आहे. इन्स्टाग्रामवर एकेक पोस्ट करून कोटय़वधी कमावणारे सेलिब्रेटी आहेत. सोशल मीडिया क्षेत्रातील कंपनी ‘हॉपर एचक्यू’ ने इन्स्टाग्राममुळे मालामाल झालेल्या जगभरातील सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रेटींची यादी प्रकाशित केली आहे.  2020 च्या यादीत हॉलीवूड अभिनेता, निर्माता आणि निवृत्त कुस्तीपटू ड्वेन जॉन्सन पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी तो सहाव्या क्रमांकावर होता. 2019 मध्ये पहिल्या क्रमांकावर असलेली अमेरिकेची टिव्ही सेलिब्रेटी  कायली जेनेर  हिला यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

ड्वेन जॉन्सन याचे इन्स्टाग्रामवर 18 कोटी 73 लाख फॉलोअर्स आहेत. एका इन्स्टा पोस्टसाठी त्याची कमाई 10 लाख 15 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजे अंदाजे सात कोटी 66 लाख रुपये एवढी आहे.

dwane-johnson-body

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कायली जेनरचे 18 कोटी 15 लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या एका इन्स्टापोस्टची कमाई अंदाजे सात कोटी 44 लाख रुपये एवढी आहे.

jener-kaylie

तिसऱ्या क्रमांकावर पोर्तुगालचा फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो आहे. त्याचे 22 कोटी 48 लाख फॉलोअर्स आहेत.  क्रिस्तियानोची एका इन्स्टा पोस्टची कमाई 6 कोटी 71 लाख रुपये आहे.

cristiano-ronaldo-new-image

विराट आणि प्रियंकाची तुफान कमाई!

हॉपर एचक्यू हॉट कॉमच्या टॉप 100 सेलिब्रेटींच्या यादीत 26 व्या स्थानावर हिंदुस्थानी क्रिकेटवीर विराट कोहली आहे. विराटचे 6 कोटी 42 लाख फॉलोअर्स असून त्याच्या एका इन्स्टा पोस्टची कमाई 2 लाख 96 हजार डॉलर्स म्हणजे 2 कोटी 23 लाख एवढी आहे.

फोटो सौजन्य- विराट कोहलीचे ट्विटर हँडल
फोटो सौजन्य- विराट कोहलीचे ट्विटर हँडल

या यादीत आणखी एक हिंदुस्थानीचे नाव आहे. ती म्हणजे अभिनेत्री प्रियंका चोप्रा. प्रियांकाचे 5 कोटी 40 लाख फॉलोअर्स आहेत. ती इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून  दोन कोटी 18 लाख रुपये कमावते.

priyanka-chopra-24

आपली प्रतिक्रिया द्या