
नेपाळच्या अन्नपूर्णा बेस कॅम्पमध्ये अडकलेल्या 17 हिंदुस्थानी पर्यटकांना वाचवण्यात यश आले. सुरक्षा रक्षकांनी 17 पर्यटकांसह 72 ट्रेकर्सना सुरक्षित बाहेर काढले. सतत बर्फवृष्टी झाल्याने हे पर्यटक अन्नपूर्णा बेस कॅम्पमध्ये अडकले होते. या ठिकाणी अडकलेले सर्व विदेशी पर्यटक हे हिंदुस्थानी नागरिक होते. डोंगराळ क्षेत्रात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी मस्तंग हून एक बचाव दल तैनात करण्यात आला होता.



























































