रोमानियात 1800 वर्षांपूर्वीच्या खजिन्याचा शोध

रोमानियात पुरातत्व विभागाला एका प्राचीन ग्रीक शहराच्या उत्खननात रोमनकालीन श्रीमंत कुटुंबाचा खजिना सापडला आहे. हा खजिना हिस्ट्रिया नावाच्या शहराच्या अवशेषांमध्ये सापडला असून त्यात 40 हून अधिक नाणी आणि मौल्यवान धातूंची प्राचीन आभूषणे आहेत. रोमानियाच्या नॅशनल हिस्ट्री म्युझियमने नुकतीच याची घोषणा केली. हा 1800 वर्षांपूर्वीचा खजिना असल्याचे सांगितले जातेय. हा खजिना एका लाकडी पेटीमध्ये लपवून ठेवला होता. रोमानियातील पुरातत्व शास्त्रज्ञांनी एक महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. या शोधामुळे इतिहासातील एका नवीन अध्यायावर प्रकाश पडला आहे. हिस्ट्रिया हे काळ्या समुद्राच्या किनारी वसलेले एक महत्त्वाचे शहर होते. घराच्या ढिगाऱ्यातून केवळ नाणी आणि आभूषणेच नव्हे, तर शिलालेख, मातीची भांडी, कांस्य, लोखंड, काच आणि दगडाच्या वस्तूदेखील मिळाल्या आहेत.