
दिल्ली, मुंबईनंतर नेपाळमधील काठमांडू विमानतळावर तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. यामुळे सर्व विमान सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास ही समस्या निर्माण झाली.
त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते रेंजी शेर्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टीवरील दिव्यांमध्ये तांत्रिक बिघाड आहे, ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे विस्कळीत होत आहेत. सध्या किमान पाच उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. विमानतळावरून येणारी आणि जाणारी सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे उशिराने सुरू आहेत.
































































