
इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता स्मार्टफोन कंपन्यांना बसणार आहे. यामुळे आयफोन, सॅमसंग आणि नथिंगचे फोन महाग होणार असून नेटफ्लिक्सचे प्लानसुद्धा महाग होण्याची शक्यता आहे. आयफोन 15 आणि आयफोन 16 च्या किमतीत 5 हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. नेटफ्लिक्सने यूएसपासून सर्व प्लानच्या सब्सक्रिप्शनच्या किमती वाढवल्या आहेत. अॅड-सपोर्टेड प्लानची किंमत आता 7.99 डॉलर म्हणजेच 747 रुपयांऐवजी 8.99 डॉलर म्हणजेच 840 रुपये प्रति महिना करण्यात आली आहे. स्टँडर्ड प्लानची किंमत 17.99 डॉलर म्हणजेच 1681 रुपयांऐवजी 19.99 डॉलर म्हणजेच 1868 रुपये प्रति महिना केली आहे. सॅमसंगने या वर्षी गॅलेक्सी एस26 सीरिजच्या किमती वाढवल्या आहेत, तर नथिंगने फोन 4ए सीरिजच्या किमती आधीच वाढवल्या आहेत.





















































