IPL 2025 – अखेर क्लासेनची बॅट म्यानातून बाहेर आलीच; हैदराबादने कोलकाताचा 110 धावांनी पराभव केला

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिमयवर धावांचा पूर पाहायला मिळाला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना फक्त तीन गड्यांच्या मोबदल्यात 278 धावा चोपून काढल्या. संपूर्ण हंगामात म्यानात ठेवलेली क्लासेनचे बॅटे शेवटच्या सामन्यात काह होईना तळपली. त्याने 39 चेंडूंमध्ये 9 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 105 घावांची धुवाँधार खेळी केली. कोलकाताचा एकही गोलंदाज त्याला बाद करू शकला नाही. त्याचबरोबर ट्रेव्हिस हेड (76) आणि अभिषेक शर्मा (32) यांनी केलेल्या धमाकेदार सुरुवातीलमुळे संघाने 278 धावंचा डोंगर उभा केला होता. आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची चांगलीच धमछाक उडाली. सुनील नरेन (31), मनिष पांडे (37) आणि हर्षित राणा (34) यांच्या व्यतिरिक्त एकही फलंदाज 30 चा आकडा गाठू शकला नाही. जयेदव उनाडकट, इशान मलिंगा आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेत संघाचा विजय निश्चित केला आणि कोलकाताचे सर्व फलंदाज 168 धावांमध्येच तंबुत परतले.