IPL 2025 – रोहितने मुंबईला पुन्हा शर्यतीत आणले

मुंबई संघात अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत आणि रोहित शर्माच्या बाबतीत सांगायचे तर त्याच्या खेळाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. मुंबईत प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या क्षणी आपले योगदान द्यायचे आहे. रोहितला आता सूर गवसला असून त्याला उर्वरित सामन्यात मोलाची भूमिका निभावायची आहे, असा विश्वास मुंबईला धडाकेबाज विजय मिळवून देणाऱया गोलंदाज ट्रेंट बोल्टने दिला आहे. रोहितच्या फलंदाजीने मुंबईला पुन्हा एकदा प्ले ऑफच्या शर्यतीत धाव घेण्याची संधी निर्माण केली आहे. तसेच हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या काळातला आनंद घेत खेळत असल्याचे बोल्ट म्हणाला.

आयपीएल गुणतालिका

संघ सा. वि. प. गुण नेररे
गुजरात 8 6 2 12 1.104
दिल्ली 8 6 2 12 0.657
बंगळुरू 9 6 3 12 0.482
मुंबई 9 5 4 10 0.673
पंजाब 8 5 3 10 0.177
लखनौ 9 5 4 10 -.054
कोलकाता 8 3 5 8 0.212
राजस्थान 9 2 7 4 – 0.625
हैदराबाद 8 2 6 4 – 1.361
चेन्नई 8 2 6 4 – 1.392

टीप – सा. – सामना, वि. – विजय,
प. – पराभव, नेररे – नेट रनरेट
(ही आकडेवारी बंगळुरू-राजस्थान सामन्यापर्यंतची आहे.)

सर्वाधिक धावा – साई सुदर्शन 417

सर्वाधिक विकेट – प्रसिध कृष्णा16