IPL 2025 – प्ले ऑफच्या धुरळ्यापूर्वीच पंजाबला तगडा झटका, हॅट्रीक घेणाऱ्या खेळाडूला दुखापत

IPL 2025 आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. पंजाब किंग्ज (PBKS), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (GT) हे संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहेत. साखळी फेरीतील तीन सामने बाकी असून 29 मे पासून प्ले ऑफचा धुरळा सुरू होणार आहे. तत्पूर्वी पंजाबच्या गोठातून मोठी बातमी समोर आली आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलला दुखापत झाल्याने संघाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शनिवारी (24 मे 2025) दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबला सहा विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीचा संघा यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्याने त्यांनी स्पर्धेचा शेवट गोड केला. या सामन्यात युजवेंद्र चहलला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी प्रवीण दुबेला संघात स्थान देण्यात आले होते. या सामन्यात पंजाबला चहलची कमतरता नक्कीच जाणवली. कारण आतापर्यंत चहलने आपल्या फिरकीची जादू सर्वांनात दाखवत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली आहे. तसेच चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात हॅट्र्की घेण्याची किमया सुद्धा त्याने साधली. त्याने IPL 2025 च्या 13 सामन्यांमध्ये 14 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. त्यामुळे युजवेंद्र चहलचं संघात असणं पंजाबसाठी महत्त्वाचं आहे.

…आणि त्याला एक संधी मिळाली! टीम इंडियामध्ये झालं पुनरागमन, आता धमाका करणार?

दिल्लीविरुद्ध पराभव पत्तकरावा लागल्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पंजाबचे सहाय्यक प्रशिक्षक सुनील जोशी यांनी, युजवेंद्र चहलला दुखापतीमुळे आराम देण्यात आल्याचे सांगितले होते. पंरतु दुखापत किती गंभीर आहे? पुढचा सामना तो खेळणार का? याबद्दल त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. पंजाबचा साखळी फेरीतील शेवटचा सामना 26 मे रोजी मुंबईविरुद्ध होणार आहे.