
आयपीएलमधून बाहेर फेकल्या गेलेल्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात राजस्थानने बाजी मारली आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 8 गड्यांच्या मोबदल्यात 187 धावा केल्या होत्या. मराठमोळ्या आयुष म्हात्रेने 20 चेंडूंमध्ये 43 धावा करत पुन्हा एकदा सर्वांनी मन जिंकली. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानने विस्फोटक अंदाजात सुरुवात केली. सलामीला आलेल्या यशस्वी जयसवाल (36), वैभव सूर्यवंशी (57) आणि संजू सॅमसन (41) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे राजस्थानने 17.1 षटकांमध्येच आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला.