
आयपील 2026 चा यंदाचा सिझन 28 मार्चला सुरू होणार आहे. सर्व संघ सध्या सरावात व्यस्त आहेत. हे सुरू व्हायला अवघे बारा दिवस शिल्लक असताना दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे.
Once a Dilliwala, always a Dilliwala. Thank you for all the love & roars, KP 💙❤️ pic.twitter.com/ItiuXWD19Y
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 15, 2026
केविन पिटरसनने दिल्ली कॅपिटल्सचे मेंटर पदाचा राजीनामा दिला आहे. त्याच्या या राजीनाम्यामुळे दिल्लीला मोठा धक्का बसला आहे. शनिवारी पिटरसनने त्याने मेंटरपद सोडल्याचे जाहीर केले. ”मी या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा मेंटॉर म्हणून काम पाहू शकणार नाही. या कामासाठी लागणारा वेळ मी देऊ शकत नाही. सर्व खेळाडूंना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा! पण काळजी करू नका, मी कॉमेंट्री बॉक्समध्ये परत येत आहे”, असे पिटरसनने सांगितले. पिटरसनने दिल्लीचे मेंटरपद सोडले जरी असले तरी तो आपल्याला आयपीएलमध्ये काँमेंट्री करताना दिसणार आहे.
पीटरसनच्या या निर्णयानंतर दिल्ली कॅपिटल्सने देखील त्याला अतिशय सन्मानपूर्वक निरोप दिला. फ्रँचायझीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून पीटरसनचा एक फोटो शेअर केला आहे. त्या सोबत ‘वन्स अ दिल्लीवाला, ऑलवेज अ दिल्लीवाला! सर्व प्रेमाबद्दल आणि समर्थनाबद्दल धन्यवाद, KP!’ असे पोस्ट केले आहे.





























































