
इंडियन प्रीमियर लीग 2026 मध्ये आज (शनिवार) अरुण जेटली स्टेडियमवर होत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या या सामन्यात खेळत नसून त्याच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानला टी 20 वर्ल्डकप जिंकून देणारा सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करत आहे.
नाणेफेकीच्या वेळी सूर्यकुमार यादवने हार्दिकच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. हार्दिकची प्रकृती ठीक नाही. तो आज खेळण्यासाठी पूर्णपणे फिट नसल्याने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज त्याच्या जागी मी नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहे, असे सूर्या म्हणाला.
दरम्यान, या लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईचा संघ तीन बदलांसह खेळत असून हार्दिकच्या जागी वेगवान गोलंदाज दीपक चहरचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच, ट्रेंट बोल्टच्या जागी कॉर्बिन बॉश आणि अल्लाह गझनफरच्या जागी मिचेल सँटनरला संधी मिळाली आहे. दुसरीकडे दिल्लीने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
मुंबई इंडियन्स –
रोहित शर्मा, रायन रिकल्टन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नमन धीर, शेर्फेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
दिल्ली कॅपिटल्स –
केएल राहुल (यष्टीरक्षक), पथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, विप्रज निगम, लुंगी एन्गिडी, कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार.




























































