
बीसीसीआय आणि आयपीएलसाठी ब्रॉडकास्ट इंजिनीयर म्हणून काम करणारे जॅन विल्यम लँगफर्ड (76) यांचा संशयास्पद मृत्यू झाला. ट्रायडंट हॉटेलमधील खोलीत ते बेशुद्धावस्थेत सापडले होते. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
जॅन विल्यम लँगफर्ड हे ब्रिटिश नागरिक होते आणि ते बीसीसीआय आणि आयपीएलसाठी ब्रॉडकास्ट इंजिनीयर म्हणून काम करत होते. लँगफर्ड यांची ट्रायडंट हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आज सकाळी ते रूमचा दरवाजा खूप वेळ झाला तरी उघडत नसल्याने कर्मचाऱयाने मास्टर चावीने दरवाजा उघडला तेव्हा लँगफर्ड हे खोलीत बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तत्काळ मुंबई इस्पितळात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखलपूर्व मृत घोषित केले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळून आलेली नाही. मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेत मरिन ड्राईव्ह पोलीस सखोल तपास करत आहेत.

























































