संघ मालकांच्या मागण्या वाढल्या, विवोने माघार घेतल्यानंतर आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न

804

आयसीसीने या वर्षी ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात येणारा टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलचे आयोजन करण्याची संधी मिळाली. मात्र सर्व काही सुरळीत सुरू असतानाच विवो या चिनी कंपनीने प्रायोजक पदावरून माघार घेतली आणि बीसीसीआयचा पाय पुन्हा खोलात गेला. आता 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्यात येणार आहे, पण विवोने माघार घेतल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी संघ मालकांनी आपल्या मागण्या वाढवल्या आहेत. बीसीसीआयसमोर त्यांनी आपल्या मागण्याही सादर केल्या असून यावर बीसीसीआयकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

मागण्या खालीलप्रमाणे

  • आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या संघांपैकी काही संघ मालकांकडून गेटमधून मिळणाऱ्या पैशांची परतफेड करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे.
  • विवोने माघार घेतल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आम्हाला करण्यात यावी असे काही संघ मालकांकडून सांगण्यात आले आहे
  • काही संघ मालक म्हणताहेत, बीसीसीआयने लवकरात लवकर विवोला पर्याया शोधायला हवा
  • कॅरेबियन प्रीमियर लीग आणि ऑस्ट्रेलिया – इंग्लंड यांच्यामधील मालिकेनंतर यूएईला येणाऱ्या खेळाडूंना कमीतकमी क्वारंटाइनचा कालावधी असावा अशी मागणीही काही संघ मालकांकडून करण्यात आली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या