
ठाणे येथील खंडणीच्या आरोपांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकरचा हायकोर्टाने जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे इक्बाल कासकरची तुरुंगातून सुटका होणार आहे.
इक्बाल याच्यावर 2017 मध्ये खंडणीप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे ईडीने त्याच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी कारवाई केली होती. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत ( मोक्का) स्थापन विशेष न्यायालयाने इक्बाल याची खंडणीच्या मूळ प्रकरणातून निर्दोष सुटका केली, ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात तो कारागृहात होता. दरम्यान, कासकार याने या प्रकरणी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायालयाने त्याचा अर्ज मंजूर केला.