Iran- Isreal War दुबई विमानतळाजवळ इराणचा ड्रोन इंधनाच्या टँकरवर पडला, भीषण आग लागल्याने विमानसेवा थांबवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात इराणने ड्रोन हल्ला केला. हे ड्रोन एका इंधनाच्या टँकरवरच कोसळले त्यामुळे तिथे मोठी आग लागली. त्यामुळे दुबई विमानतळ प्रशासनाने सर्व विमान उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. याचा प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

इराणकडून डागण्यात आलेले ड्रोन विमानतळाजवळील एका इंधानाच्या टँकरवर पडले. त्यामुळे भीषण आग लागली. यामुळे परिसरात आगीचे मोठे लोळ आणि धूर पाहायला मिळाले. दुबई सिव्हिल डिफेन्सच्या (Dubai Civil Defence) अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. सुदैवाने, या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या घटनेनंतर दुबई नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने (Dubai Civil Aviation Authority) सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळावरील सर्व कामकाज थांबवले आहे.

Emirates Airlines ने आपल्या सर्व प्रवाशांना विमानतळावर न येण्याचे आवाहन केले आहे. ज्यांची उड्डाणे रद्द झाली आहेत, त्यांना पुढील माहिती एअरलाईन्सकडून दिली जाईल असे सांगण्यात आले आहे. तर अचानक विमानसेवा ठप्प झाल्याने हजारो प्रवासी विमानतळावर अडकून पडले आहेत. अनेक विमाने इतर जवळच्या विमानतळांकडे वळवण्यात आली आहेत.