इराणला वर्ल्ड कप मेक्सिकोत खेळायचाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम आशियात पेटलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आगामी फिफा वर्ल्ड कपमध्ये इराणच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच इराणने वर्ल्ड कप खेळण्याची भूमिका घेतली आहे. मात्र अमेरिकेत खेळण्यास नकार देत आपल्या सामन्यांचे आयोजन मेक्सिकोमध्ये करण्यासाठी इराणने थेट फिफाशी संपर्क साधल्याची धक्कादायक माहिती मेक्सिकोतील इराणी दूतावासाने मंगळवारी दिली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण संघाच्या सुरक्षेबाबत शंका उपस्थित करत त्यांच्या सुरक्षिततेची हमी देणे कठीण आहे, असे वक्तव्य केले होते. याच पार्श्वभूमीवर इराणने खेळाडूंच्या जीविताचा प्रश्न असेल तर अमेरिकेत आम्ही जाणार नाही, असा इशारा दिला आहे.