
जागतिक पातळीवरील तेलाच्या व्यापाराला इराण युद्धाचे विनाशकारी परिणाम भोगावे लागतील, असा इशारा सौदी अरेबियातील आघाडीची तेल कंपनी अरामकोचे सीईओ अमीन नासेर यांनी दिला आहे. युद्धामुळे तेल पुरवठ्याची साखळी पुरती विस्कळीत झाली आहे. त्याचा परिणाम केवळ जहाज वाहतुकीपुरता मर्यादित असून विमान सेवा, शेती, वाहन उद्योग आणि इतर अनेक उद्योगांवरही होत आहे. ‘सध्याची परिस्थिती जितका जास्त काळ कायम राहील, तितके जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होतील,’ असे नासेर म्हणाले. ‘आखातातील तेल व वायू उद्योगावरचे आजवरचे हे सर्वात मोठे संकट आहे,’ असेही त्यांनी सांगितले.




























































