
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सेवा देणाऱ्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. कर्मचाऱ्यांनी कचऱ्याचा डबा डोक्यात एकमेकांच्या डोक्यात घातला, बेल्टने मारहाण केली. नवी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्टेशनवर शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. ट्रेन हजरत निजामुद्दीनहून ग्वाल्हेरला निघण्यापूर्वी कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हजरत निजामुद्दीन-खजुराहो वंदे भारत एक्सप्रेस (22470) दररोज सकाळी 6 वाजता हजरत निजामुद्दीनहून रवाना होते. शुक्रवारी नियमित वेळेप्रमाणे एक्सप्रेस निघण्यापूर्वी आयआरसीटीसीच्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी आणि त्यानंतर मारामारी झाली. दरम्यान, आयआरसीटीसी अधिकाऱ्यांनी आणि भारतीय रेल्वेने कर्मचाऱ्यांनी या घटनेबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.